चंद्रकांत मांडरे
चंद्रकांत मांडरे हे एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते आणि कलाकार होते. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि कलेसाठी आयुष्य वेचले. पेंटिंग आणि पावडर शेडिंगमध्ये ते निपुण होते. त्यांनी 1935 मध्ये सावकारी पाश नावाच्या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. 1995 मधला बनगरवाडी हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या त्यांच्या भूमिका आजही चित्रपट सृष्टीमध्ये मापदंड मानल्या जातात. रुपेरी पडद्यावर दिसलेल्या सर्वात देखण्या मराठी नायकांपैकी ते एक होते. त्यांचे भाऊ सूर्यकांत हे देखील प्रसिद्ध अभिनेता होते. नंतर त्यांनी आपले आयुष्य चित्रकला आणि कलेसाठी वाहून घेतले आणि त्यांचा "निसर्ग" हा बंगला आणि त्यांची सर्व चित्रे महाराष्ट्र सरकारला संग्रहालय सुरू करण्यासाठी दान केली. 17 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांचे निधन झाले. चंद्रकांत मांडरे , (१३ ऑगस्ट १९१३ - १७ फेब्रुवारी २००१) हे एक प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते [ १ ] [ २ ] [ ३ ] कलाकार होते. त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि कलेसाठी त्यांचे जीवन समर्पित केले. ते ...